Friday, September 25, 2026
HomeनगरRahata : अध्यात्मिक ऊर्जा केंद्र बनेल असा सराला बेटाचा विकास करु

Rahata : अध्यात्मिक ऊर्जा केंद्र बनेल असा सराला बेटाचा विकास करु

मुख्यमंत्र्यांचा शब्द, भाविकरूपी महासागराच्या साक्षीने गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहाची शानदार सांगता

राहाता | Rahata

असा विकास करु की संपूर्ण महाराष्ट्राचे सराला बेट उर्जेचे केंद्र बनेल, अध्यात्मिक केंद्र बनेल. महंत रामगिरी महाराजांच्या अशिर्वादाने एक प्रमुख तिर्थस्थळ म्हणून सराला बेटाचा विकास केल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असे सांगत राज्यातील शेतकर्‍यांना 12 तास 365 दिवस मोफत वीज देण्याचा निर्णय घेेतला असल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील श्री श्रेत्र धनगरवाडी येथे सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताहाची काल सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, आमदार प्रा. रमेश बोरणारे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदींच्या तसेच लाखो भाविकांच्या उपस्थितीत झाली. त्याप्रसंगी मुख्यमंत्री भाविकांसमोर बोलत होते.

अध्यात्माच्या संकिर्तनाने आपले जीवन यशस्वी होते. हरिभक्तीचे नामस्मरण करताना आपल्यातला अध्यात्म जिवंत ठेवला जात आहे. संस्कृती जिवंत ठेवली जात आहे. सराला बेटावर विविध प्रकारची विकास कामे करण्याचा विकास आराखडा आपण तयार केला. सराला बेट भाविकांसाठी उर्जेचे केंद्र असेल. सराला बेटावर सरकार सोलरचे काम हाती घेणार आहे. अध्यात्मिक, सज्जन शक्ती उभी होती म्हणूनच विजय मिळविला. सर्वांना बरोबर घेवूनच राज्याचे कारभार आम्ही करत आहोत. कर्ज माफीत 12.5 लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. 56 लाख शेतकर्‍यांची कर्ज माफी करणार आहोत. दर 15 दिवसांनी यादी तयार केली जाते. बळीराजाच्या, शेतकर्‍यांच्या पाठीशी आमचे सरकार उभे आहे. सरकार शेतकर्‍यांना मोफत वीज देत आहोत. सध्या 75 टक्के शेतकर्‍यांना दिवसा 8 तास मोफत वीज देत आहोत. पुढे लोकांना मोफत वीज दिली जाईल. यापुढे 12 तास 365 दिवसा मोफत वीज देण्याचा सरकार निर्णय घेतला आहे. पूर्वीचे शेतकर्‍यांच्या 58 हजार कोटींची थकित विजबिले माफ करणार आहोत. बळीराजा, शेतकरी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे.

भारतीची संस्कृती, सभ्यता जुनी आहे. युरोप, अमेरिका हे अस्तित्वात नव्हते, त्यावेळी आपल्या देशात विकसित संस्कृती होती. सनातन संस्कार होता. भाविकता, हरिपाठ होता. दुसर्‍या देशावर आक्रमणे झाली. त्यातून त्यांची संस्कृती, विचार बदलले. परंतु भारतावर अनेकवेळा आक्रमणे झाली. परंतु आपल्या देशाची संस्कृती आणि विचार बदलले नाहीत. हिंदू धर्मावरही आघात झाले, परंतू संस्कृती आणि मार्ग बदलला नाही. त्यांनी आक्रमणामुळे आपले मंदिरे तोडली. पण ते आपले विचार, भक्ती बदलू शकले नाहीत.

सदगुरु गंगागिरी महाराज सप्ताहाची 179 वर्षांची परंपरा आहे. कित्येक पिढ्या गेल्या मात्र सप्ताहाची परंपरा तिथेच आहे. महंत रामगिरी महाराजांनी ही परंपरा चांगल्या प्रकारे पुढे चालविली. त्यामुळेच तुम्ही आम्ही येथे येतो. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी दिलेला हरिनामाचा वारसा आहे. गंगगिरी महाराजांचा वारसा आहे. हरिनामामुळे जिवनातील दु:ख नष्ट होते. स्वार्थ राहात नाही. सप्ताहात जातीपातीचा विचार नाही. सर्वजण ऐकमेकांत विठ्ठल पाहतात. रामगिरी महाराजांनी एवढा मोठा अध्यात्म उभा केला. अध्यात्म जिवंत ठेवण्याचे काम ते करत आहेत.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सरकार संतांच्या अशिर्वादामुळेच सत्तेवर आले. महंत रामगिरी महाराजांच्या पाठिशी सरकार आहे. संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कुणी कितीही आटापिटा केला तरी ही योजना बंद होणार नाही. सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा आहे. कर्ज माफीच्या दुसर्‍या टप्प्यात 5 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जखाती जमा करण्यात आले आहेत.

गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहामुळे गिनीज बुकचे महत्व वाढले.-शिंदे
सप्ताहाची गिनीज बुक मध्ये नोंद झाली. यावर ना. शिंदे म्हणाले, गिनीज बुक ने सप्ताहाची दखल घेतली, त्यामुळे गिनीज बुक चे महत्व वाढले. सप्ताहाची परंपरा रामगिरी महाराज पुढे नेत आहेत, पुढे न्या, सरकार तुमच्या पाठीशी आहे.

या हरिनाम सप्ताहाला देखील राज्यमान्यता द्यावी-ना. विखे
लोकांच्या उत्स्फूर्त आणि विक्रमी सहभागामुळे सदगुरु गंगगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आता खर्‍या अर्थाने लोकोत्सव झाला आहे. आषाढी कार्तिकेच्या वारी प्रमाणेच या अखंड हरिनाम सप्ताहाला देखील राज्य सरकारने अधिकृत राज्यमान्यता द्यावी, अशी विनंती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सात दिवसांच्या या सप्ताहात महंत रामगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून सर्वांना जीवनाचे सार कळाले असून परस्परांमध्ये बंधुभाव वाढवावा, व्यसनमुक्त समाज राष्ट्र अधिक बलशाली करणाच्या संकल्प या सप्ताहाच्या माध्यमातुन करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले, महंत रामगिरी महाराज अव्यहातपणे अध्यात्माचा हा पवित्र वारसा पुढे घेऊन जात आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा देशातील संपुर्ण अध्यात्मिक चळवळीला पाठबळ देणारा ठरलेला आहे. आषाढी कार्तिकीच्या वारीप्रमाणेच वारी प्रमाणेच या सप्ताहाला देखील शासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका घेऊन राज्यसरकाने या सोहळ्याला अिधिकृत राज्यमान्यता प्रदान करावी, अशी अग्रही विनंती मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

मुख्यमंत्रीसाहेब, श्रीरामपुरातील अराजकता थांबवा विरोधासाठी सर्वात पुढे असेन – रामगिरी महाराज

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मुख्यमंत्रीसाहेब, श्रीरामपूर शहरात काही काळापासून धर्माच्या नावाखाली अराजकता सुरू झाली आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती थांबवावी, असे साकडे महंत रामगिरी महाराज यांनी घालतानाच, धर्माच्या नावाखाली कुणी अन्याय, अत्याचार करीत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी सर्वात पुढे मी असेन, असा इशाराही त्यांनी दिला.

श्री श्रेत्र धनगरवाडी येथे सद्गुरु योगिराज गंगागिरी महाराज 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगते प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते.
महंत रामगिरी महाराज म्हणाले, धर्माचा कार्य सर्वांनीच करावं, पण ते करीत असताना कुणी अन्याय-अत्याचार करीत असेलतर या अराजकतेला विरोध करण्यासाठी मी पुढे असेन, कारण अराजकता करण्याकरिता हा धर्म नाही, धर्म अराजकता शिकवित नाही. म्हणून अशा प्रकारची अराजकता घडू नये. दुसर्‍या धर्माचा अनादर नको. श्रीरामपूर शहारात काही काळापासून खूप अराजकता सुरु झालेली आहे त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन ती थांबवावी असे आवाहन केले.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले कार्य करत आहेत. सर्व साधु संतांचा हा महाराष्ट्र आहे. कुणी महाराष्ट्राला पुरोगामी म्हणत असेल, कुणी प्रतिगामी म्हणत असेल तर हे अलिकडच्या काळातले आहे. खरं तर महाराष्ट्र हा ज्ञानोबा, तुकोबांचा आहे. वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राची कल्पना देखील होऊ शकत नाही. म्हणून वारकरी सांप्रदायाला कुणी लांच्छन लावण्याचा प्रयत्न करु नये. सराला बेटाच्या संदर्भात बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, सराला बेटावर विकास कामे सुरु आहेत. अनेक मंत्री महोदयांनी मदत केली. ना. गिरीष महाजन यांनी 7 कोटी रुपये सभामंडपासाठी दिले. रस्त्यांची कामे झाली. नदीवर पूल झाला. महापुरामुळे बेटावरची माती वाहुन जाते.

तेथे संरक्षक भिंत असावी, मोठा खर्च आहे, इतरही कामे आहेत. विकास कामांचा आरखडा सादर केलेला आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविक बेटावरही स्नानासाठी येतात, त्यामुळे बेटावर घाटाचे काम तात्काळ हाती घ्यावे, ध्यान मंदिर तयार करायचे आहे. असा एकूण 165 कोटी रुपये खर्चाचा आरखडा सादर केलेला आहे. वारकर्‍यांना परमार्थ करण्यासाठी सोय व्हावी, असा या मागचा उद्देश आहे. सरकारने गो हत्या बंदीचा कायदा केला. महाराजांनी या निर्णयाचे कौतुक केले. गोसंवर्धनासाठी मदतीचे कौतुक केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाच्या झळा; कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar दुष्काळी परिस्थिती, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, डोक्यावर वाढत गेलेला कर्जाचा बोजा आणि त्यातच आजारपणाच्या उपचारांचा खर्च अशा आर्थिक विवंचनेतून खडकी (ता....