Monday, October 14, 2024
Homeभविष्यवेधक्लेश नव्हे, आनंद निवडा

क्लेश नव्हे, आनंद निवडा

सद्गुरु- बहुतेक लोक दररोजच्या अगदी सरळ, सोप्या गोष्टी करण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. ते काही ब्रम्हांड त्यांच्या डोक्यावर घेऊन फिरत नसतात. केवळ उपजीविकेसाठी कमावणे, संतती निर्माण करणे आणि एके दिवशी मरून जाणे, यामध्ये येवढा गाजावाजा करण्यासारखे काय आहे? सर्व प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता हे सहज साध्य करत आहेत, पण माणसं मात्र यातून भल्या मोठ्या क्लेश आणि संघर्षातून जातो.

तुम्हाला आनंदी कसे राहावे हे माहिती नाही ही अडचण नाहीये. तो कायम कसा ठेवावा हे तुम्हाला माहिती नाही हीच तुमची मूळ समस्या आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे, जेंव्हा बाह्य परिस्थिती अनुकूल बनतात तेंव्हा तुम्ही थोडेसे आनंदी बनता. जेंव्हा तसे घडत नाही, तेंव्हा तुम्ही नाराज होता. तुमच्या मर्जीप्रमाणे बाह्य परिस्थिती बनायला हवी असेल तर तुमच्या जीवनाची व्याप्ती अतिशय मर्यादित असायला हवी. असे समजूया की तुमचे संपूर्ण जीवन या खोलीपुरतेच मर्यादित आहे – तेव्हा तुमच्या इच्छेनुसार नव्वद टक्के गोष्टी घडतील, दहा टक्के गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतील.

- Advertisement -

पण जर तुमच्या जीवनाची व्याप्ती खूप मोठी असेल, असे समजू की ती संपूर्ण जगभर पसरली आहे, तेव्हा तुमच्या इच्छेनुसार दहा टक्केच गोष्टी घडतील, आणि नव्वद टक्के गोष्टी नेहमीच नियंत्रणाबाहेर असतील. म्हणून बाहेरील गोष्टी जेव्हा जेव्हा तुमच्या इच्छेनुसार घडत नाहीत तेंव्हा जर तुम्ही हताश होत असाल, तर स्वाभाविकपणे तुम्ही तुमच्या जीवनाची व्याप्ती कमी कराल कारण तसे केल्याने तुम्हाला क्लेश, दुःख होत आहे. बाह्य गोष्टी तुमच्या इच्छेनुसार शंभर टक्के कधीच घडणार नाहीत. विशेषतः त्या तुम्हाला पाहिजे तशा घडत नसतील, तर किमान तुम्ही तरी तुमच्या इच्छेनुसार घडा. आणि मग कोणतीच समस्या उरणार नाही.

जर तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा तुमच्याकडून सूचना घेत असतील, तर तुम्ही स्वतःला अतिशय आनंदी आणि समाधानी ठेवाल. कृपया आनंदाची निवड करा, दुःखांची नको हे कोणीही तुम्हाला शिकवण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला तशा प्रकारच्या धर्म ग्रंथांची गरजच भासणार नाही. पण सध्या तुमच्या निवडीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे तुम्हाला माहिती नाही कारण शरीर आणि मन तुमच्या व्यक्तिमत्वाचे मूलभूत घटकच तुमच्याकडून सूचना स्वीकारत नाहीत. जर त्यांनी तुमच्याकडून सूचना स्वीकारल्या असत्या तर तुम्ही साहजिकच स्वतःला आनंदी ठेवाल.

स्वतःला आनंदी ठेवणे हेच खुद्द एक काही आयुष्याचे ध्येय नाही कारण तुम्ही जर शांत आणि आनंदी असाल तरच तुमचे शरीर आणि मन त्यांच्या सर्वोत्कृष्ठ पातळीवर कार्यरत असतील. आणि जगात तुम्हाला मिळणारे यश आणि कार्यक्षमता यासाठी हीच मूलभूत मोजमापे आहेत. तुमची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता ही एखादी गोष्ट करण्याची तुम्हाला असलेल्या इच्छेवर अवलंबून नाही, तर ती तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे. जेंव्हा तुम्ही एखाद्या दुःखी, विमनस्क किंवा निराश अवस्थेत असता, तेंव्हा तुमच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे विपरीत परिणाम होतो.

म्हणून तुम्हाला जर उत्पादकतेत रस असेल, तर सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदी आधारभूत पाया निर्माण करणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ज्यामुळे शांत आणि आनंदी राहणे ही आपल्यासाठी समस्या राहणार नाही. हे कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही – हा तुमचा मूळ स्वभावच बनला आहे. असे असेल तर तुमचे शरीर आणि मन सर्वोत्तम प्रकारे कार्य करेल. तुम्हाला जे निर्माण करण्याची इच्छा आहे ते तुम्ही विनासायास निर्माण करू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या