पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांचा मुलगा सागर धस (Sagar Dhas) याच्या कारने दुचाकीला जोराची धडक (Car and Bike Accident) दिल्याने झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील नितीन प्रकाश शेळके (वय 34) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री साडेदहा वाजेदरम्यान अहिल्यानगर पुणे रस्त्यावर पारनेरच्या (Parner) जातेगाव घाट फाट्यावर झाला. या प्रकरणी मंगळवारी दुपारी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा (Supa Police Station) दाखल झाला आहे.
स्वप्निल पोपट शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सागर सुरेश धस (रा. आष्टी ता. आष्टी जिल्हा बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजेेदरम्यान नितीन शेळके अहिल्यनगर-पुणे महामार्गावर (Ahilyanagar Pune Highway) पळवे खुर्द (Palave Khurd) शिवारातील जातेगाव फाट्यावर (Jategav Phata) त्याच्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या आलिशान कारने पाठीमागून जोराची धडक (Hit) दिली.
सागर धस हा अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. जोराची धडक (Hit) बसल्याने नितीन शेळके यांना दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू (Death) झाला. या अपघातात दुचाकीसह आलिशान कारचे मोठे नूकसान झाले आहे. पुढील तपास सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंगेश नागरगोजे पुढील तपास करत आहेत.




