Saturday, July 27, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरला आज पासून राज्यस्तरीय सहकार मेळावा

त्र्यंबकेश्वरला आज पासून राज्यस्तरीय सहकार मेळावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा व सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या सहकार मेळाव्यात सहकार मित्र राज्यस्तरीय पुरस्काराचे विचारण देखील केले जाणार असल्याची माहिती कल्याणी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष अंजली पाटील आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव माळी यांनी दिली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या, स्वामी समर्थ केंद्राजवळील सद्गुरु धाम आश्रम येथे राज्यस्तरीय सहकार मेळावा आयोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

या मेळाव्यासाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील ढिकले आणि महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काकासाहेब कोयटे, यांच्यासह आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, हिरामण खोतकर, जिल्हा सहनिबंधक विलास गावडे, उपनिबंधक सह्याद मुलानी, अर्चना सौंदाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सदाशिव माळी यांनी दिली.

राज्यस्तरीय सहकार मित्र पुरस्काराची घोषणा करताना कल्याणी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंजली पाटील यांनी सांगितले की, या पुरस्कारामध्ये सहकार मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यात सुरेश वाबळे ( नगर ) नीलिमा बावणे (नागपूर ), गोरख चव्हाण (मुंबई ), शशिकांत साळुंखे ( जळगाव ), वासुदेव काळे (श्रीरामपूर ), संदीप माळी (कुंडल जि. सांगली ) यांचा समावेश आहे.

तसेच या कार्यशाळेच्या निमित्याने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची 34 वार्षिक सर्वसाधारण सभा देखील होणार आहे या सर्व कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन बरोबरच सातपूर येथील श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था आणि नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशन यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या