Monday, June 24, 2024
Homeनगरसाई आनंद रियालिटीचा ले-आऊट बेकायदेशीर

साई आनंद रियालिटीचा ले-आऊट बेकायदेशीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगरच्या आनंदधाम परिसरातील श्री साई आनंद रियालिटी प्रकल्पाच्या जागेचा मूळ ले- आऊट बेकायदेशीर असून महानगरपालिका आयुक्तांनी सदर बेकायदेशीर ले- आऊट, बांधकाम परवानग्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविला आहे. जानेवारी 2022 पासून सातत्याने पाठपुरावा करून मनपाचा कारभार उघडा पडला असून पुराव्यांनिशी तक्रार सिध्द केल्याची माहिती तक्रारदार विशाल वालकर यांनी दिली.

मनपा आयुक्तांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या स्वाक्षरीनिशी अहवाल शासनाला पाठविला आहे. साई आनंद रियालिटीच्या भागीदारांनी 18 मे 2018 रोजी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवाना मिळवून मोठी इमारत बांधली. परवाना देताना नगररचना विभागाने बेकायदेशीररित्या जादा प्रिमियम देऊन टिडिआरही बेकायदेशीरपणे वाढवून दिला. या प्रकारामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने वालकर यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी महापालिका आयुक्त व नगरविकास विभाग येथे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत शासनाने 25 जानेवारी 2022 च्या पत्रान्वये मनपा प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तक्रारदार वालकर यांनी सदर जागेचा ले-आऊटच बेकायदेशीर असल्यासंदर्भातील संचिकेचे तब्बल 1 हजार पानांचे अतिरिक्त पुरावे नगरविकास खात्याचे नगरसचिव व मनपा आयुक्तांकडे सादर केले होते.

या पुराव्यानुसार महापालिकेने साई आनंद रियालिटीला ज्या क्षेत्रासाठी बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र मंजूर केले ते क्षेत्र बिल्डरांनी खरेदी करण्यापूर्वी राष्ट्रीय पाठशाळा या संस्थेच्या नावे होते. परंतु, सदर जागेसंदर्भात बाजूचे ले- आऊट धारक व राष्ट्रीय पाठशाळा यांच्यात न्यायालयात वाद होऊन दावा चालला. राष्ट्रीय पाठशाळेने व साई आनंद रियालिटीचे भागीदार यांनी मूळ उतार्‍यावरील बेकायदेशीर नोंदी कमी न करता पुढे महापालिकेचीही कागदपत्रांची अफरातफर करून दिशाभूल केली व बेकायदेशीर ठरविण्यात आलेल्या ले- आऊट मंजूर करून घेतला असल्याची तक्रार विशाल वालकर यांनी दाखल केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या