Saturday, September 12, 2026
HomeनगरShirdi : हैदराबादच्या साईभक्ताकडून साईचरणी 23 लाखांचा सुवर्ण-हिरेजडित हार अर्पण

Shirdi : हैदराबादच्या साईभक्ताकडून साईचरणी 23 लाखांचा सुवर्ण-हिरेजडित हार अर्पण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविक भक्तिभावाने (Sai Baba Devotee) श्रींच्या चरणी विविध प्रकारे दान (Donation) अर्पण करत असतात. याच श्रद्धेपोटी तेलंगणा (Telangana) राज्यातील हैदराबाद (Hyderabad) येथील साईभक्त के. एस. एस. भगवान यांनी श्री साईबाबांच्या चरणी 193.700 ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण-हिरेजडित हार (Gold-Diamond Necklace) अर्पण केला.

- Advertisement -

या हाराची किंमत 23 लाख 59 हजार 653 रुपये आहे. याप्रसंगी जिल्हा व प्रधान न्यायाधीश तथा श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष शिवाजीराव कचरे यांच्या हस्ते दानशूर साईभक्त के. एस. एस. भगवान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...