Tuesday, March 25, 2025
Homeनगरदहीहंडी फोडून साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता

दहीहंडी फोडून साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची (Sai Baba Punyatithi) सांगता रविवारी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून करण्यात आली. विजयादशमी (Vijayadashami) व साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी रविवारी पहाटे श्रींचे मंगल स्नान त्यानंतर शिर्डी (Shirdi) माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी 7 वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. कैलास खरे, रत्नागिरी यांचे काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त बायजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य राजेंद्र सुभाष कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली.

- Advertisement -

यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर पुजारी शिर्डीतील ग्रामस्थ अमृत गायके, सचिन तांबे, संजय शिंदे, अमोल गायके, अशोक गायके, मिलिंद शेळके आदी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी श्रींची माध्यान्ह आरती नंतर उदय दुग्गल, पुणे यांचा साईभजन व ललिता पांडे, जोगेश्वरी यांचा साई स्वराधना कार्यक्रम झाला. तसेच सायंकाळी सक्सेना बंधु, दिल्ली यांचा साईभजन संध्या हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला.

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या (Sai Baba Punyatithi) मुहुर्तावर श्री साईबाबा संस्थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवारी संस्थान तदर्थ समितीच्या हस्ते करण्यात आले. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहु, तांदुळ ज्वारी व बाजरी असे 115 पोते धान्य आणि गुळ, साखर व गहु आटा असे 3 लाख 65 हजार 530 रुपये व रोख स्वरुपात रुपये 61 हजार 501 रुपये अशी एकूण 4 लाख 27 हजार 31 रुपये देणगी भिक्षा झोळीव्दारे प्राप्त झाली.

हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले व सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...