शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
ठाणे (Thane) येथील साईभक्त (Sai Devotee) धरम कटारिया यांनी गुरुवारी साई चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट (Gold Plate) देणगी म्हणून अर्पण केले आहे. साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे. याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक साईबाबांना (Sai Baba) विविध दान अर्पण करत असतात.
- Advertisement -
गुरुवारी ठाणे (Thane), मुंबई (Mumbai) येथील हीर रिअल्टी व्हेंचर कंपनीचे साई भक्त धरम कटारिया यांनी साई चरणी 660 ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण ताट (Gold Plate) अर्पण केले. या सुवर्ण ताटाची किंमत 74 लाख 49 हजार 393 असून ते साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट अर्पण केल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साई भक्त धरम कटारिया यांचा सकार करण्यात आला.




