शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा समाधी मंदिरातील श्री साईबाबांच्या संगमरवरी इटालीयन मार्बल मूर्तीची थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करणेकामी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांनी सुचित केल्याप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या विविध तज्ज्ञ समितीमधील सदस्य दि. 20 डिसेंबर रोजी शिर्डी येथे येऊन साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
- Advertisement -
त्यामुळे 20 रोजी दुपारी 1.45 ते 4.30 या वेळेत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी व त्यानुसार आपली यात्रा योजना आखावी, अशी विनंती साईबाबा संस्थानच्यावतीने करण्यात आली आहे.