Saturday, July 27, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानचे प्रशासकीय कामकाज झाले पेपरलेस

साईबाबा संस्थानचे प्रशासकीय कामकाज झाले पेपरलेस

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थान महाराष्ट्रातील नंबर एक आणि देशातील नंबर दोनचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या संस्थानने आपले संपूर्ण कामकाज पेपरलेस केले आहे. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष वाचणार असून साईबाबांनी स्वतः वृक्ष संगोपनाचा संदेश दिल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

साई संस्थानात वर्षाकाठी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. तसेच जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त भाविक वर्षभरात साई मंदिरात दर्शनासाठी येतात. साई संस्थानचा कारभारही तसा मोठा आहे. येथे उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली जिल्हा प्रधान न्यायाधिशांची तदर्थ कमेटी असून आएएस दर्जाचा सनदी अधिकारी येथे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नियुक्त आहे. संस्थानच्या 44 विभागातून दिवसभरात अनेक फाईल्सचा वावर येथील कार्यालयात असतो. मात्र आता हे सर्व कामकाज पेपरलेस करण्यात आले आहे. राज्य सरकारने मागेच प्रशासकीय कारभार ई-ऑफिस करत पेपरसेल केला जाईल, असे घोषित केले होते. त्यानंतर आता साई संस्थानने राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आपले देखील सर्व कारभार पेपरलेस केले. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष वाचणार असून साईबाबांनी स्वतः वृक्ष संगोपनाचा संदेश दिल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले.

आशियातील सर्वात मोठे प्रसादालय साई संस्थान चालवते. प्रसादालयाला 2010 मध्ये आयएसओ नामांकन मिळाले होते. तसेच साईबाबा संस्थानच्या साई आश्रम, भक्त निवास, साई प्रसादालय, भक्त निवास, दारावती भक्त निवास यांना देखील चांगली स्वच्छता राखण्यासाठी 2014 मध्ये आयएसओ नामांकन मिळाले होते. साईबाबा संस्थानाच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी आयएसओ अधिकारी शिर्डीत येतात. त्यानंतर दरवर्षी आयएसओ नामांकनाचे नुतनीकरण केले जाते.

दरम्यान या आयएसओ नामांकनाच्या नुतनीकरणाचा खर्च बेंगळुरू येथील साईभक्त केशू मूर्ती यांनी उचलला आहे. साईबाबा संस्थानला हे आयएसओ नामांकन प्रमाणपत्र नुकतेच देण्यात आले. साईभक्त केशू मूर्ती यांनी हे प्रमाणपत्र दिले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्विकारले आहे. गेल्या 14 वर्षांत साईबाबा संस्थान स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन झाले आहे. साई संस्थेचे आयएसओ नामांकन मिळवण्यासाठी साई संस्थेचे अध्यक्ष सुधाकर येरलागड्डा, साई संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, प्रसादालयाचे प्रमुख विष्णू थोरात आणि कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या