Saturday, July 27, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्यांनाही शैक्षणिक शुल्क परतावा

साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्यांनाही शैक्षणिक शुल्क परतावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्याच्या 2020-21 आणि 2021-22 या वर्षाचे शैक्षणिक शुल्क परतावा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधि व न्याय विभागाने आदेश दिला आहे. यासाठी प्रत्येकी 50 लाख असे दोन वर्षांचे एक कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या आस्थापनेवरील काही कर्मचार्‍यांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक फिचा परतावा देण्यात येतो. त्याच धर्तीवर आता कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्काचा परतावा देण्यात येणार आहे. 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक फीचा परतावा करण्यास व त्यासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्चास सरकारने मान्यता दिली आहे.

कंत्राटी कर्मचार्‍यां शैक्षणिक फिच्या परताव्याबाबत सरकारच्या विधी व न्याय विभागाने आदेश काढला आहे. यामध्ये म्हटले की, कंत्राटी कर्मचार्‍यांना इतर कोणत्याही सेवांविषयक किंवा आस्थापनाविषयक लाभ अथवा अन्य सुविधांसाठी संस्थांवर दावा करता येणार नाही. यासाठी श्री साईबाबा संस्थानद्वारे सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था यांनी या आदेशाची अंमलबजावणी करून झालेल्या खर्चाच्या पत्रासह अहवाल सादर करण्याचेही यामध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या