Sunday, September 13, 2026
Homeनगरसाईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी दराडे

साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी दराडे

दराडे नेवाशाचे रहिवाशी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राज्य शासनाने साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी भीमराव दराडे यांची नियुक्ती केली आहे. दराडे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून नेवाशाचे रहिवाशी आहेत. दराडे यांच्याकडे या अगोदर जळगाव जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी होती. राज्य शासनाने काल त्यांची प्रतिनियुक्तीवर साई संस्थानकडे बदली केली आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या तुकाराम हुलवळे यांची या पदावरून बदली झाली, गेली काही महिने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार संदीप भोसले यांच्याकडे होता. आता पुन्हा एकदा दराडे यांच्या रुपाने जिल्ह्याच्या भूमीपुत्राला डेप्युटी सीईओ पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत अवघा 22 दिवसच पाऊस

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पडणार्‍या पावसात 40 दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडला आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत गेल्या चार महिन्यांत अवघा...