Saturday, September 12, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत काल्याच्या किर्तनाने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Shirdi : शिर्डीत काल्याच्या किर्तनाने गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्यावतीने (Sai Baba Sansthan) तीन दिवस सुरु असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाची (Guru Purnima Festival) सांगता गुरुवारी वेदश्री वैभव ओक डोंबिवली यांच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवारी सकाळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. गुरुस्थान मंदिर येथे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर काल्याच्या किर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य ऋुतुराज निलेश कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, सचिन तांबे, अमृत गायके, सुधाकर शिंदे, राजेंद्र सुभाष कोते, विशाल कोते, संजय शिंदे, अशोक गायके, मिलिंद शेळके, वैभव कोते आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

दुपारी साईबाबांची माध्यान्ह आरती झाली. त्यानंतर निरज शर्मा नवी दिल्ली (New Delhi) यांचा साई भजन कार्यक्रम झाल्यानंतर राज आचार्य, कोलकत्ता साई कि लिला कार्यक्रम झाला. सायंकाळी विजय साखरकर, बोरीवली यांचा साईस्वर नृत्योत्सव कार्यक्रम संपन्न झाला. सांगता दीनी गुरुवार असल्याने रात्रौ श्रींचे गुरुवारचे नित्याचे पालखीची मिरवणुक (Palkhi Procession) झाली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी तामिळनाडु, चेन्नई येथील साईभक्त आर. वेत्री सेल्वी अव्वल राज यांनी साईबाबांच्या चरणी 32.200 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सुवर्ण साखळी अर्पण केली. या सुवर्ण साखळीचे देणगी मुल्य 4 लाख 20 हजार 983 रुपये आहे.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष न्यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Collector Dr. Pankaj Ashiya), मुख्य कार्यकारी अधिकारी, उप कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...