Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : साईबाबा संस्थानकडून गुरूपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण

Shirdi : साईबाबा संस्थानकडून गुरूपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्यावतीने बुधवार, दि. 09 जुलै ते शुक्रवार दि. 11 जुलै 2025 या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. या तीन दिवसीय उत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येण्याची शक्यता असून, त्यांच्या सोयीसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. उत्सवाची सुरुवात बुधवार दि. 9 जुलै रोजी श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाने होईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी, गुरुवार दि. 10 जुलै रोजी रात्री श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल आणि समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. यामुळे दि. 10 जुलैची रात्रीची शेजारती व दि. 11 जुलैची पहाटेची काकड आरती होणार नाही.

- Advertisement -

उत्सवादरम्यान अनुराधा पौडवाल, सक्सेना बंधू, पद्मश्री मदनसिंह चौहान यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. उत्सवातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात पावसापासून संरक्षणासाठी 63 हजार 700 चौरस फुटांचे मंडप उभारण्यात आले आहेत. भाविकांच्या निवासासाठी साईबाबा भक्तनिवासस्थान आणि साईधर्मशाळा येथे 29 हजार 500 चौरस फुटांचे अतिरिक्त निवासी मंडप उभारले आहेत. उत्सवाच्या काळात प्रसादालयात अंदाजे 3 लाखांहून अधिक भाविकांसाठी विशेष मिष्टान्नासह भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 60 क्विंटल बुंदीचा मोफत प्रसाद आणि 150 क्विंटल लाडू प्रसादाचे नियोजन आहे.

YouTube video player

अमेरिकेतील साईभक्त श्रीमती सुब्बा पै यांच्या देणगीतून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि संस्थानच्या सुरक्षा कर्मचार्‍यांसह शीघ्र कृती दल आणि बॉम्ब शोधक पथकाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सर्व साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ गाडीलकर यांनी केले आहे. गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी ब्रेक दर्शन बंद असल्याचेही गाडीलकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...