Friday, April 25, 2025
Homeनगरनववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीत शिर्डी महोत्सवाचे आयोजन

नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीत शिर्डी महोत्सवाचे आयोजन

31 डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्यावतीने (Sai Baba Sansthan) नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत (Shirdi) होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर मंगळवार 31 डिसेंबर 2024 रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.

- Advertisement -

श्री. कोळेकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी (Christmas Holiday), चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्‍या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणार्‍या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने मंगळवार 31 डिसेंबर 2024 रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेजारती व 1 जानेवारी 2025 रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. तसेच नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवार 25 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 रोजी असे 7 दिवस वाहन पूजा बंद राहतील. परंतु नाताळ सुट्टीचे कालावधीत श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरु राहील.

तसेच मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन श्री. कोळेकर यांनी केले. हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...