Friday, July 24, 2026
HomeनगरShirdi : साईबाबा संस्थान; सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट

Shirdi : साईबाबा संस्थान; सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेली बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन व दिशाभूल करणारी असून या माध्यमातून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवर श्री साईबाबा संस्थानविरोधात एफडीएने मोठी कारवाई करून लाडू निर्मिती केंद्र व प्रसादालय सील केल्याचा दावा करण्यात आला होता. सदर बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसून श्री साईबाबा संस्थानचे साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभाग नियमितपणे अन्न सुरक्षा व आरोग्य विषयक सर्व आवश्यक मानकांचे पालन करून कार्यरत आहेत.

संस्थानामार्फत चालविण्यात येणार्‍या साई प्रसादालयात दररोज हजारो भाविकांना मोफत प्रसाद भोजन दिले जाते. तसेच लाडू व बर्फी निर्मिती विभागात तयार होणार्‍या लाडू व बुंदी प्रसादाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तपासण्या तेथील प्रयोगशाळेत तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते.

सोशल मीडियावरील संबंधित पोस्टमुळे साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची तसेच संस्थानच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने हे अकाउंट चालविणार्‍या संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या अप्रमाणित व दिशाभूल करणार्‍या माहितीवर विश्वास ठेवू नये. संस्थानशी संबंधित अधिकृत माहिती केवळ संस्थानच्या अधिकृत माध्यमांद्वारेच ग्राह्य धरावी, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानने सर्व साई भक्तांना केले आहे.

ताज्या बातम्या

सायखेडा

Nashik News: गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सायखेडा, चांदोरी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

0
चांदोरी | वार्ताहरनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सायखेड्याच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे...