Tuesday, April 23, 2024
Homeनगरश्री साईबाबांची शेजारती व पहाटेची काकड आरती भोंग्यावरून चालु ठेवा

श्री साईबाबांची शेजारती व पहाटेची काकड आरती भोंग्यावरून चालु ठेवा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणार्‍या शिर्डी (Shirdi) येथील साईमंदीरावरील (Sai Temple) भोंग्यावरुन (Bhonga) श्री साईबाबांची शेजारती आणि पहाटेची काकड आरती बंद न करता शासनाने विशेष बाब म्हणून परवानगी (Permission) देऊन चालू करावी अशी मागणी शिर्डी (Shirdi) शहरातील जामा मस्जिद ट्रस्ट (Jama Masjid Trust) मुस्लिम समाज (Muslim society) बांधवांनी केली असून या आशयाचे निवेदनपत्र शिर्डी पोलीस ठाण्याचे (Shirdi Police Station) पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील (PI Gulabrao Patil) यांना देण्यात आले असून साईबाबांच्या सबका मालीक एक संदेशाप्रमाणे शिर्डीत (Shirdi) हिंदू मुस्लिम (Hindu-Muslim) एकात्मतेचे दर्शन बघायला मिळाले.

- Advertisement -

दरम्यान शिर्डी (Shirdi) शहरातील जामा मस्जिद ट्रस्ट (Jama Masjid Trust) मुस्लिम समाज बांधवांनी (Muslim society) पोलीस निरीक्षक श्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भोंगवाद (Bhonga Dispute) आणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मशिदीबरोबरच साईमंदीरावरील (Sai Temple) भोंगे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात आले आहे. येथील मशिदीत नमाज झाली पण अजानासाठी कोणीही लाऊडस्पीकर (Loudspeaker) वापरला नाही. मात्र गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदीरातील रात्रीची शेजारती आणी पहाटेची काकड आरती लाऊडस्पीकर शिवाय झाली हे अतिशय वेदनादायक आहे. साईबाबा देवस्थान जागतिक किर्तीचे तसेच सर्वधर्मसमभावाचे प्रतिक आहे.

साईबाबांच्या द्वारकामाई मशिदीवर गेली सव्वाशे वर्षापासून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला हिरवा व भगवा ध्वज एकत्र लावला जातो. रामनवमी उत्सवात रामजन्माच्या कार्यक्रमाबरोबर संदलची मिरवणूक असते. रोज सकाळी दहा वाजता हिंदू मुस्लिम एकत्रितपणे साईसमाधीवर फुले वाहातात. येथील हिंदू मुस्लिम ऐक्याला या भोंग्या वादाने गालबोट लागणे योग्य नाही. येथे देशविदेशातून भाविक येत असतात. या मंदीरावर पंचक्रोशीतील नागरीकांची रोजीरोटी अवलंबून आहे.

या जागतिक किर्तीच्या देवस्थानावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता ते पूर्ववत सुरू ठेवावे व विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. यावेळी निवेदन पत्र जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार, बाबाभाई सैय्यद, इब्राहिम सैय्यद, रज्जाकभाई शेख, मेहमूद सैय्यद, सरदार पठाण, आमिर शेख, शमशुद्दीन शेख, नसिरभाई दारुवाले, मन्सूरअली शेख, समिर शेख, आश्रफआली शेख, आयुब पठाण, युसुफ सैय्यद, सादीक इनामदार, सुलेमान सैय्यद, गणीभाई पठाण, जावेद शेख, याकुब शेख, आयुब शहा, सत्तारभाई शेख, राजूभाई सैय्यद, जमिल सैय्यद, मुश्ताक पटेल आदी मुस्लिम बांधवाच्या सहीनिशी देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या