Wednesday, February 4, 2026
HomeनगरShirdi : साईबाबांचा गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात सुरु

Shirdi : साईबाबांचा गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात सुरु

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवास बुधवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
बुधवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन, तर प्र. अधिक्षक विजय वाणी व प्र. उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला.

- Advertisement -

यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे साईसच्चरित ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, विजय वाणी यांनी द्वितीय अध्याय, भिमराज दराडे यांनी तृतीय अध्याय, संदीप भोसले यांनी चौथा अध्याय व विश्वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी 9 ते 11.30 सुमित पोंदा, भोपाल यांचा साई अमृत कथा, दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली.

YouTube video player

दु. 1.30 ते 3.30 वाजता सक्सेना बंधु दिल्ली यांचा साईभजन संध्या, सायंकाळी 4 वाजता संतोष तेलंग, बोरीवली यांचे कीर्तन, सायंकाळी 7 वाजता श्रींची धूप आरती, रात्री 7.30 ते 9.30 विजय साखरकर, बोरीवली यांचा साईस्वर नृत्योत्सव, रात्री 9.15 वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शेजारती रात्री 10 वाजता झाली. यादिवशी अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले होते. साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली.

आज गुरुवार दि. 10 जुलै रोजी पहाटे श्रींची काकड आरती, अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 6.20 वाजता श्रींचे मंगल स्नान व दर्शन आणि श्रींची पाद्यपूजा होईल. 9 ते 11.30 सुमित पोंदा, भोपाल यांचा साईअमृत कथा, तर दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती होईल. दुपारी 1 ते 3 यावेळेत निरज शर्मा, नवी दिल्ली यांचा साईभजन, सायंकाळी 4 वाजता वेदश्री ओक, बोरीवली यांचे कीर्तन होणार असून, सायंकाळी 7 वाजता श्रींची धूपआरती, रात्री 7.30 ते 10 अनुराधा पौडवाल, मुंबई यांचा साई संध्या, रात्री 9.15 वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. गुरुवार असल्याने नित्याची चावडी पूजन होईल. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार आहे. या दिवशी श्रींची शेजारती व शुक्रवार 11 जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. रात्री 10 ते पहाटे 05 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहेत.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...