Tuesday, September 8, 2026
HomeनगरShirdi : साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

Shirdi : साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

पहिल्याच दिवशी 1 कोटी 3 लाखांचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांच्या (Sai Baba) हयातीत सुरू झालेल्या व शतकोत्तरी उज्ज्वल परंपरा लाभलेल्या साईनगरीतील श्री गुरुपौर्णिमा उत्सवाला (Guru Purnima Celebration) मंगळवारी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून 60 पेक्षा जास्त पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून, पहिल्याच दिवशी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) व गुजरात (Gujarat) येथील दानशूर भाविकांनी कोट्यवधी रुपयांचे सुवर्ण मुकुट (Golden Crown) व सुवर्ण ॐ साई चरणी अर्पण केले आहेत.

- Advertisement -

पुणे, मुंबई, ठाणे, हिंगोली, पैठण, सांगली, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार, नेवासा, कोपरगाव, राहाता तसेच गोवा राज्यातून पायी आलेल्या पालख्यांचे मंगळवारी सायंकाळी शिर्डीत आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, साई भजनांचा ठेका आणि साईनामाच्या जयघोषाने संपूर्ण साईनगरी दुमदुमून गेली होती. भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे संस्थानचे सर्व भक्ती निवास, खाजगी लॉजिंग आणि हॉटेल्स पूर्णपणे हाउसफुल झाली आहेत. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे काकड आरतीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, उप कार्यकारी अभियंता संजय जोरी आणि राहुल गलांडे यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. द्वारकामाई मंदिरात श्री साईसच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा पार पडली. उत्सवानिमित्त साईराज डेकोरेटर्स (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने आणि बंगळुरू येथील कंपनीने केलेल्या नयनरम्य फुलांच्या सजावटीने समाधी मंदिर परिसर उजळून निघाला आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन व रात्री गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांच्या चरणी 1 कोटी 3 लाख रुपये किमतीचा 642 ग्रॅम वजनाचा नवग्रहाचा सोन्याचा मुकुट आंध्र प्रदेशातील वेल्लूरचे साईभक्त (Sai Devotee) श्रीनिवास राव यांनी अर्पण केला. याशिवाय मध्य प्रदेशातील जबलपूरचे ए. के. शर्मा यांनी 6 लाख 28 हजार रुपये किमतीचा 48 ग्रॅमचा सुवर्ण मुकुट (Golden Crown), तर गुजरातमधील वडोदरा येथील विजय नाईक यांनी 3 लाख 34 हजार रुपये किमतीचे दोन सुवर्ण ॐ अर्पण केले. आज, बुधवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून भाविकांच्या सोयीसाठी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे. संस्थान आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...