Thursday, February 5, 2026
HomeनगरShirdi : साई मंदिरात अधिकार्‍यांची मनमानी!, कुलूप संस्कृतीला ग्रामस्थांचा विरोध

Shirdi : साई मंदिरात अधिकार्‍यांची मनमानी!, कुलूप संस्कृतीला ग्रामस्थांचा विरोध

सबुरी संपली, संस्थान अधिकार्‍यांविरोधात ग्रामस्थ आंदोलन करणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या अधिकार्‍यांकडून अलीकडच्या काळात विविध स्तरांवर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करून या विरोधात ग्रामस्थ आणि साईभक्तांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वांचा प्रचार करणार्‍या या पवित्रस्थळी आता कुलूप संस्कृती सीईओ गाडीलकरांनी सुरू केली असून, मंदिर प्रशासनाने भक्त आणि ग्रामस्थांवर अन्याय करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप साई संस्थानचे माजी विश्वस्त कैलासबापू कोते यांनी केला आहे.

- Advertisement -

देणगीदार साईभक्तांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच तदर्थ समितीने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना कैलासबापू कोते यांनी मंदिरात सध्या सुरू असलेल्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. सध्या साईसंस्थानमध्ये सीईओ चांडाळ चौकडीच्या इशार्‍यावर कारभार करीत असून, कामगारांपासून भक्तांपर्यंत सगळ्यांवर अन्याय सुरू आहे. रेड कार्पेट अधिकार्‍यांच्या पाहुण्यांसाठी टाकले जात असून सामान्य भाविकांसाठी कुलूपं लावले आहे. मंदिर परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून कुलुपं ठोकण्यात आली आहेत. मात्र सीईओ, अधिकारी वर्गाच्या ओळखीचे पाहुणे किंवा स्वत: ला देणगी देणारे देणगीदार आल्यानंतर ती कुलुपं उघडून रेड कार्पेटसह स्वागत केलं जातं.

YouTube video player

यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गंध तिर्थ व सत्काराच्या सुविधा केवळ अधिकारी वर्गाच्या मर्जीतील भाविकांसाठीच उपलब्ध करून देण्यात येतात. उर्वरित सामान्य साईभक्तांकडे दुर्लक्ष केले जाते. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे असे कोते यांनी सांगितले. शिर्डी ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या सबुरीचा अंत झाला आहे. आता ग्रामस्थ आणि भाविक एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारणार आहेत.

मंदिरात मनमानी कारभार करणार्‍या अधिकार्‍यांविरोधात लढा दिला जाईल, असा इशारा कोते यांनी दिला. मंदिराच्या सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर कोते यांनी टीका केली. व्हीआयपी पाहुणे आले की सीईओ यांच्या कुटुंबियांना सत्कारासाठी कोणत्या अधिकाराने बोलावले जाते? तसेच आयपीएल सामन्यात कोणत्या अधिकार्‍यांचे कुटूंबीय व्हीव्हीआयपी कक्षात झेंडा फडकावत होते. यात ‘साईराम’ होता का ? असा सवाल उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी श्री. कोते यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...