Saturday, October 3, 2026
HomeनगरShirdi : साई मंदिराला दुबईस्थित साईभक्ताचे सुवर्णदान

Shirdi : साई मंदिराला दुबईस्थित साईभक्ताचे सुवर्णदान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानला (Sai Baba Sansthan) देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. गुरुवारी दुबई (Dubai) येथील एका साईभक्ताने साई मंदिराच्या (Sai Temple) उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली आहे.

- Advertisement -

याखिडकीतून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात. या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेले सुवर्ण नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर संबंधित साईभक्ताचा साईबाबा संस्थानचे (Sai Baba Sansthan) मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ​हाय-सिक्युरिटीत रंगला कैद्यांचा कॅरम! नाशिकराेड कारागृहातील व्हिडीओ व्हायरल;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अत्यंत संवेदनशील आणि हायप्रोफाइल कैद्यांचा भरणा असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या (Nashik Road Central Jail) सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह...