Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : साईभक्ताकडून साईचरणी 68 लाख रूपयांचा सुवर्ण मुकुट दान

Shirdi : साईभक्ताकडून साईचरणी 68 लाख रूपयांचा सुवर्ण मुकुट दान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांच्या खजाण्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने, चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान (Donation) साईभक्तांकडून जमा होत असून शनिवारी दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश येथील एका साई भक्ताने (Sai Devotees) 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट (Gold Crown) दान दिला असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

- Advertisement -

साईबाबांच्या चरणी देश विदेशातील कोट्यावधी भाविक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. यामध्ये सोने (Gold), चांदी, हिरे तसेच रोख रक्कम यासह इतर मौल्यवान वस्तूंचा समवेश असतो. मागील काही वर्षांपासून भाविकांकडून दानात येणार्‍या साईबाबांच्या सुवर्ण मुकुटांच्या (Gold Crown) संखेत लक्षणीय वाढ झाली.

YouTube video player

शनिवारी आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने (Sai Devotees)साईचरणी 788.44 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत 68 लाख रुपये असल्याची माहिती संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. त्यामुळे आता साईबाबा संस्थानकडे (Sai Baba Sansthan) सुवर्ण मुकुटांची संख्या 28 वर पोहचली आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...