Saturday, July 27, 2024
Homeनगरसाईभक्तांची खाजगी लक्झरी बस शिर्डीत दुभाजकावर धडकली

साईभक्तांची खाजगी लक्झरी बस शिर्डीत दुभाजकावर धडकली

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या साईआश्रम एक समोर नगर मनमाड महामार्गावर साईभक्तांना घेवून जाणारी खाजगी प्रवासी बस दुभाजकावर धडकली. अपघातात दुभाजकावरील हायमॅक्स लाईटचा पोल खाली कोसळला. यात बसमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सदरचा चित्तथरारक प्रसंग सिसिटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

- Advertisement -

रविवारी सकाळी नगर मनमाड महामार्गावर साईबाबा संस्थानच्या साईआश्रम समोर एक खाजगी प्रवासी बस श्रीरामपूरच्या दिशेने वेगाने जात असतांना दुभाजकाला जाऊन धडकली. त्यावेळी बसमध्ये बसलेले दोघे बाहेर फेकले गेले. तर दुभाजकावर असलेल्या हायमॅक्स लाईटचा पोल रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. सदर बस (क्रमांक एम एच 03 सीवी 1818) मुंबईवरून शिर्डी व श्रीरामपूर येथे जात असताना हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये पुढे कॅबीनमध्ये बसलेल्यांपैकी एक जण बसच्या पुढच्या काचेतून बाहेर फेकला गेला.

सदरचा तरुण श्रीरामपूर येथील रहिवासी असून त्याचे नाव कल्पेश शाम कुर्‍हे असे आहे. त्याच्या मानेला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तर दुसरा रितेश प्रकाश पाटणी हा देखील श्रीरामपूर येथील असून तो किरकोळ जखमी झाला आहे. त्यास साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. साईबाबा संस्थानच्या साईआश्रम एक समोर खाजगी वाहने तसेच फुटपाथ विक्री करणार्‍यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असल्याने येणार्‍या साईभक्तांना मार्गक्रमण करतांना नाकीनऊ येत आहे. अपघातासमयी गर्दी नसल्याने जीवितहानी टळली आहे. 17 ऑगस्ट रोजी साईआश्रम एक येथे साई चरीत्र पारायण सोहळा सुरू होत आहे. त्याअनुषंगाने पारायणार्थींना संस्थानने गेटसमोरून आतमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अशी मागणी पारायणार्थींनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या