Sunday, May 26, 2024
Homeमनोरंजनसई लोकूर लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले फोटो

सई लोकूर लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले फोटो

मुंबई – Mumbai

अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिने शेअर केलेले खास फोटो. या फोटोतून सईने तिच्या आयुष्यातील खास गोष्ट शेअर केली आहे. सईने आपण प्रेमात असल्याची भावना व्यक्त केली आहे.

- Advertisement -

सईने आपलं लग्न ठरल्याची माहिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. एवढंच नव्हे तर हळदीचे फोटो देखील शेअर केलेत. ‘लग्नगाठ ही स्वर्गातच बांधली जाते….’ अशी एक पोस्ट शेअर करत आपल्याला आपला जोडीदार मिळाल्याची कबुली दिली आहे. हॅशटॅग वापरत सईने फोटो शेअर केलाय खरा पण यामध्ये आपल्या जोडीदारासोबतचा पाठमोरा फोटो शेअर केलाय.

या फोटोनंतर सई पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे.

ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे, ती व्यक्ती नेमकी कोण आहे? तिचा हा जोडीदार सिनेसृष्टीतला आहे की अजून कुणी?, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

सईच्या हातावर मेहंदी सुद्धा लावली आहे. सईने तीन फोटो शेअर केलेत. 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या