Tuesday, May 21, 2024
Homeनगरसाई संस्थानच्या सीईओचा कार्यभार हुलवळेंकडे

साई संस्थानच्या सीईओचा कार्यभार हुलवळेंकडे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

- Advertisement -

साई संस्थानचे मावळते सीईओ पी. शिवा शंकर यांच्या कडून हुलवळे यांनी, बुधवारी सायंकाळी हा अतिरिक्त पदभार स्वीकारला. राज्याच्या विधी व न्याय विभागाने या संदर्भातील आदेश काढले. सामान्य प्रशासन विभागाकडून नवीन अधिकार्‍याची नियुक्ती झाल्यानंतर हा कार्यभार आपोआप संपुष्टात येईल.

हुलवळे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून अकोले तालुक्यातील रहिवाशी आहेत. इथे काम करतांना तदर्थ समितीच्या मर्जीत राहून येथील प्रथा परंपरा जपताना ग्रामस्थ व साई संस्थानचा समन्वय राखण्याचे दिव्य हुलवळे यांना पार पाडावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या