Tuesday, October 22, 2024
Homeनगरकर्मचार्‍यांना शिर्डी संस्थानमध्ये सामावून घ्या

कर्मचार्‍यांना शिर्डी संस्थानमध्ये सामावून घ्या

खा. लंके यांचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

साईबाबा संस्थानमध्ये सलग 10 वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना संस्थानच्या सेवेत सामावून घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

या पत्रात खा. लंके यांनी नमुद केले आहे की, संस्थानमध्ये 10 वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना संस्थान सेवेत कायम करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिलेला आहे. तसेच तदर्थ समितीने 2 ऑगस्ट 2014 च्या मान्यतेनुसार सादर करण्यात आलेल्या शिर्डी संस्थानच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसे पत्रही विधी व न्याय विभागाने संस्थानकडे पाठविलेले आहे.

परंतु 10 वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत अद्याप कायम करण्यात आलेले नाही. संस्थानने न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच विधी व न्याय विभागाच्या पत्रानुसार कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी खा. लंके यांनी या पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या