Tuesday, March 25, 2025
Homeनगरसाई संस्थानच्या भोजनासाठी कुपन बंधनकारक

साई संस्थानच्या भोजनासाठी कुपन बंधनकारक

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर निर्णय

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णासाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुरुवार, 6 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू होईल. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी संगितले. काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचे तसेच भोजनानंतर परिसरातच धूम्रपान करत असल्यामुळे साईभक्तांना त्रास होतो. या सारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात सध्या जवळपास रोज पंचेचाळीस हजार भाविक मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत.

- Advertisement -

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर उदी-प्रसाद वाटप काउंटरजवळ मोफत भोजनाचे कूपन दिले जाईल, ते दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मुखदर्शन घेणार्‍या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसादभोजनाचे तिकीट दिले जाईल. संस्थान निवासस्थानातील भाविकांसाठी निवासस्थानातील स्वयंसेवी भोजन कक्षामध्ये रूमची पावती, चावी दाखवून प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील नातेवाईकांसाठी केसपेपर, अ‍ॅडमिट कार्ड दाखवून द्वारावती भक्तनिवास येथील प्रसाद भोजन कक्ष, मुख्य प्रसादालयात प्रवेश दिला जाईल. कुणाला दर्शनापूर्वी प्रसाद भोजन घ्यायचे असेल तर त्यांनाही मोफत व्यवस्थेचा लाभ मिळेल. सशुल्क प्रसाद भोजनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
शालेय सहली, पालखी पदयात्रींसाठी प्रसादालय अधीक्षक खातरजमा करून विद्यार्थ्यांना, पदयात्रींना लेखी पत्र घेऊन प्रवेश देतील.

नाष्टा पाकीटाचे कुपणही सकाळी दर्शनरांगेत देण्यात येणार आहेत. ते कूपन संबधित काउंटरवर दाखवून तेथे पैसे भरून नाष्टा पाकीट मिळेल. या नवीन व्यवस्थेमुळे साईभक्तांना प्रसाद भोजन घेणे अधिक सोपे आणि सुरक्षित होईल, असा विश्वास गाडीलकर यांनी व्यक्त केला आहे. मोफत भोजन व्यवस्थेमुळे शिर्डीत भिकारी व गुन्हेगार वाढल्याने भाविकांशिवाय इतरांसाठी मोफत भोजन बंद करावे अशी मागणी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी केली होती. त्यावर मोठा गदारोळ झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...