Friday, May 3, 2024
Homeनगरलॉकडाऊनपासून बंद असलेली साईबाबांची पालखी सुरू करावी

लॉकडाऊनपासून बंद असलेली साईबाबांची पालखी सुरू करावी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत चालू असलेली गुरुवारची पालखी मार्च महिन्यात लॉकडाऊनपासून बंद करण्यात आली

- Advertisement -

असून राज्यातील इतर देवस्थानप्रमाणे सुरू करण्यात यावी याविषयीची मागणी शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन पत्रात म्हटले आहे की, साईबाबांच्या हयातीपासून दर गुरुवारी द्वारकामाईतून पालखी काढण्यात येत आहे. मात्र मार्च महिन्यापासून सदरचा पालखी सोहळा बंद करण्यात आला आहे.

राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर शेगाव आदी ठिकाणच्या देवस्थानांप्रमाणे शिर्डीतील साईबाबांची दर गुरूवारची पालखी संस्थानमार्फत कमीत कमी पुजारी तसेच पालखीसाठी लागणारे कर्मचारी यांंच्यासह भक्तांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था सुरू करावी यासाठी आम्ही शिर्डी ग्रामस्थ आपल्याला सहकार्य करू, असे पत्रात म्हटले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साई निर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, गटनेते अशोक गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, नगरसेवक शिवाजी गोंदकर, शिवसेना नेते कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर, स्वामी रिसोर्टचे संचालक विलासराव कोते, दत्तात्रय कोते, दीपक वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या