Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनसैफ अली खान लिहिणार आत्मचरित्र

सैफ अली खान लिहिणार आत्मचरित्र

मुंबई | Mumbai –

बॉलीवूडचा नवाब म्हणून ओळख असलेला अभिनेता सैफ अली खान लेखक बनला आहे. लिखाणाची नवी इनिंग सुरू करीत

- Advertisement -

त्याने लिहिलेले आत्मचरित्र पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हार्पर कॉलिंस इंडियामार्फत हे आत्मचरित्र प्रकाशित केले जाणार आहे. या प्रकाशन संस्थेने मंगळवारी सैफच्या चाहत्यांना ही खूशखबर दिली. सैफ अली खान आत्मचरित्रातून फिल्म इंडस्ट्रीतील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहे. Saif Ali Khan Announces Autobiography

तो आपल्या पुस्तकात कुटुंब, घर, यश, अपयश, प्रेरणा आणि चित्रपट प्रवास उलगडणार आहे. खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. जर आम्ही या गोष्टी नोंदवून ठेवल्या तर काळाबरोबर त्या गमवाव्या लागतील. मागे वळून पाहणे, आठवण करणे व त्या आठवणींना नोंदवून ठेवणे चांगले असते. हे अत्यंत रंजक असते. वाचक या पुस्तकाचा आनंद घेतील, असे मत सैफने व्यक्त केले. दरम्यान, लेखक बनण्याच्या त्याच्या निर्णयाची सोशल मीडियात चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. ट्विटरवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ATM : चाेरट्यांनी एटीएम मशिन पळविले

0
नाशिक। प्रतिनिधी Nashik एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही कॅमेरे जाळून चाेरट्यांनी एटीएम मशिन चाेरुन नेले आहे. ही घटना मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील विनयनगर परिसरात घडली असून मशिनमध्ये...