Tuesday, September 17, 2024
Homeनगरसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत

विठू नामाच्या गजराने श्रीरामपूर नगरी दुमदुमली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

विठू नामाच्या गजरात व निवृत्तीनाथ महाराजांच्या जयजयकारात त्रंबकेश्वरहून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे व दिंडीचे श्रीरामपूर नगरीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुन्या संगमनेर नाक्याजवळ पालखीचे स्वागत प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक अशोकराव कानडे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी व संचालक मंडळ, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, भाजपाचे प्रकाश चित्ते, मिलिंद साळवे, लोकसेवा आघाडीचे सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष आण्णासाहेब डावखर, व्यापारी असोसिएशनचे गौतम उपाध्ये, संजय कोठारी, संजय गाडेकर, वर्धमान पाटणी, राहुल कोठारी, माजी नगरसेवक राजेश अलघ, ज्ञानेश्वर मुरकुटे, ग्रंथपाल स्वाती पुरे, साक्षी आहिरे हमाल पंचायतचे हरिभाऊ आजगे आदींनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.

नॉर्द्रन ब्रॅन्च जवळ निवृत्तीनाथांची पालखी रथातून खाली उतरवून तरुणांनी विठुनामाच्या जयजय करत मेनरोड मार्गे श्रीरामपूर मंदिरात आणली. मंदिरामध्ये मंदिराचे विश्वस्त प्रणिती गिरमे, रोहन गिरमे, दिनेश सुर्यवंशी व उपाध्ये परिवाराच्या वतीने पालखी व पादुकांची पुजा-अर्चा करण्यात आली. दिंडीतील भाविकांना संगमनेर रोड, नेवासा रोड, बेलापूर रोड आदी रस्त्यावर पाणी, केळी, भजी, साबुदाणा खिचडी, बिस्कीट पुडे व भोजनाचे अनेक स्टॉल लागलेले होते. मेनरोडवर तृतीयपंथीयांच्या वतीने वारकर्‍याचे स्वागत करून त्यांना बिस्टीकाचे पुडे व पाण्याचे पाऊच वाटण्यात आले. आम आदमी पार्टीच्या वतीने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत जिल्हा प्रमुख तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, प्रवीण जमदाडे, राहुल रणपिसे, भैरव मोरे, भरत डेंगळे, श्रीधर कराळे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, राहुल रणबीर, निखिल पवार, रोहित भोसले, किशोर ढोक यांनी पालखीचे स्वागत केले. सकल मराठा समाज श्रीरामपूर यांचेवतीने बेलापूर रोडवरील मुळा-प्रवरा जवळ साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

पालखी व दिंडीचे मानकरी मोहन महाराज हिरवे, बेलापुरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण डावरे महाराज हे नेतृत्व करत असून दिंडीमध्ये पालखी सोहळ्याच्या प्रथमच महिला अध्यक्ष कांचन जगताप, विश्वस्त राहुल साळुंके, पालखी सोहळा प्रमुख नवनाथ गांगुर्डे, नारायण मुठाळ, विश्वस्त श्रीपाद कुलकर्णी, माधवदास राठी, अ‍ॅड. घोटेकर आदी दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीतील भाविकांना शेतकरी, व्यापारी, कांदा व्यापारी, भुसार व्यापारी, भाजीपाला व्यापारी आदींच्या वतीने भंडारा देण्यात आला. दिंडीतील बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यानी रस्त्यावरील कागद, प्लेटा, केळांची सालपट आदी तातडीने उचलून रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. भाविकांनी रस्त्यावर रांगोळी, सडे टाकून पालखीचे स्वागत केले.

निवृत्तीनाथांच्या पालखीच्या दर्शनासाठी शहरातील रस्त्याने भाविकांची दुतर्फा गर्दी दिसत होती. यावेळी वारकर्‍या सोबत फुगडी खेळण्याचा आनंद कृषक समाजाच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यासह अनेकांनी लुटला. उपाध्ये यांच्या निवासस्थानी श्रीरामपुरकरांच्या वतीने पालखीचे मानकरी मोहन महाराज व पालखी सोहळ्याचे अध्यक्ष कांचन जगताप यांचा सत्कार करण्यात आला. ही पालखी बेलापूर येथे मुक्कामास असून आज रविवारी सकाळी ती राहुरीकडे प्रस्थान करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या