Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधसंत वेणाबाई

संत वेणाबाई

-सुरेखा बोऱ्हाडे

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

- Advertisement -

संत वेणाबाई या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. सीता स्वयंवर आणि अनेक अभंग त्यांनी लिहिले. त्यांनी संत रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणार्‍या सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावे लागले. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले आणि मठपती बनवले.

त्यांच्यापैकी वेणाबाईंचे कार्य महान होते. या मूळच्या कोल्हापूर येथील राधिकाबाई आणि गोपजीपंत गोसावी यांच्या कन्या होत्या. विवाहानंतर त्या मिरज येथील देशपांडे यांच्या घरी गेल्या. काही काळातच, म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. त्यांचे आई-वडील समार्थांचेच अनुगृहीत होते, तर सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. वेणाबाई विधवा असून संतसंगतीत राहतात, विद्याभ्यास करतात म्हणून कोल्हापुरातील काही मंडळींची मजल तर वेणाबाईंना विषप्रयोग करण्यापर्यंत गेली होती. वेणाबाईंनी विष पचवून दाखवले. निंदकांना पश्चाताप झाला. त्यांनी वेणाबाई आणि समर्थांची क्षमा मागितली. प्रारंभी कणखर मानाने जननिंदा सोसणार्‍या वेणाबाईंनी कोमल अंतःकरणाने सर्वांना क्षमा केली. समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्याकाळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपवली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणास्वामींवर सोपवण्यात आली. उत्सवासाठी सगळ्या प्रकारची धान्ये निवडून ठेवणे, लोणची, चटण्या, सांडगे, पापड, मेतकुट या सर्व गोष्टी सिद्ध ठेवणे, समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठीघरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत. ऐन उत्सवाच्या 15 दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या. त्या तापाने एवढ्या फणफणल्या की त्यांना चालताही येईना.

वेणास्वामींनी राममंदिरातील खांबाला धरून मोठ्या मुश्किलीने त्यांनी रामाजवळ करुणा भाकली. वेणाबाईंची ही केविलवाणी अवस्था पाहून चाफळातील राममूर्तीच्या डोळ्यांत अश्रू आले आणि काय आश्चर्य! प्रभू रामचंद्रांनी रामाबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. ‘मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे’, असे रामाबाईंनी वेणाबाईंना बळेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. रामाबाईही गुप्त झाल्या.

वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. सीता स्वयंवर वगैरे काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. सीतेचे स्वयंवर वेणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे. वेणाबाईंच्या ग्रंथाची योग्यता काही अनोखीच आहे. रामदास स्वामींनी इ.स.1656 मध्ये बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना सर्वजण आदराने वेणास्वामी असे म्हणतात. संत वेणाबाईंची ग्रंथरचना मोठी आहे.

उपदेशरहस्य, कौल, पंचीकरण-वेदांतावरील गद्य टिप्पण्या, रामायणी प्रकरण, रामायणाची कांडे आदी अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदरकांड असे एकूण दीड हजार श्लोक लिहिले. सिंहासन हे रामायणी प्रकरण, सीता स्वयंवराचे एकूण चौदा समास यातील ओवीसंख्या 1568 आहे. स्फूट असे अनेक अभंग, पदे त्यांनी लिहिले. वेणूबाई यांचा मृत्यू अंदाजे इ.स.1700 साली झा

- Advertisment -

ताज्या बातम्या