श्रीगोंदा |ताालुका प्रतिनिधी| Shrigonda
काष्टी मुख्य शाखा असलेले साईसेवा मल्टीस्टेट आणि साईसेवा पतसंस्थेत कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या असून ठेवीदारांच्या तोंडाला चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचालकांनी पाने पुसली असताना संस्थेचे अनेक महत्वाची कागदपत्रे संगनमताने गायब करण्यात आली असून संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत बनवाबनवी करत असल्याने ठेवीदारांनी 15 तारखेला उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
साईसेवा पतसंस्थेच्या आणि मल्टीस्टेटच्या गुंतवणूकदार सहा महिन्यांपासून ठेवी परत मिळण्यासाठी वाट पाहत आहेत. चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि काही संचालकांनी संगनमताने दोन्ही ठिकाणच्या ठेवींचा अपहार करत जमिनी, प्लॉट, स्वतःचे व्यवसाय आणि खाजगी कंपनीमध्ये पैसे वापरले. कर्ज घेताना कागदपत्रे दिली नाहीत. हातावर कोट्यवधी रुपये शिल्लक दाखवले असे अनेक उद्योग करत ठेवीदारांच्या पैशाला चुना लावला आहे. आश्वासनानंतरही शुक्रवारी (दि.10) ठेवीदारांना पैसे न देता सगळे पदाधिकारी गायब झाले. यामुळे आक्रमक झालेले ठेवीदार आता उपोषण करणार आहेत.
संस्थेचे महत्वाची कागदपत्रे संगनमताने गायब करण्यात आली असून याच काळात संचालक आणि अधिकारी यांनी घेतलेले बिगर कागदपत्राचे कर्ज तसेच हातावरील कोट्यवधीची शिल्लक रक्कम चर्चेचा विषय बनला आहे.





