जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
तालुक्यातील साकत (Sakat) घाटातील वळणावर (Valan) रविवारी (दि. 18) सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटात पलटी होवून झालेल्या अपघातात (Truck Accident) किन्नर सुमित ताराचंद राठोड (वय 31, रा.मठतांडा, ता. अंबड, जि.जालना) याचा जागीच मृत्यू (Death) झाला तर चालक केवळ शांतीलाल चव्हाण गंभीर जखमी (Injured) झाला आहे.
घटनेबाबत माहिती अशी, जालना (Jalna) जिल्ह्याती चिखली (Chikhali) येथून मका घेवून पुण्याकडे जात असलेला ट्रक रविवारी सकाळी आठ वाजता जामखेड जवळील साकत घाटामध्ये पलटी झाला. दरम्यान, किन्नरने (Kinner) उडी मारल्याने तो ट्रक खाली दबून त्याचा मृत्यू (Death) झाला. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी त्याला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज शिंदे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच संजय कोठारी हे दीपक भोरे, विशाल ढवळे यांच्यासमवेत रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांना हरिभाऊ मुरूमकर, नय्युम पठाण, काका मुरूमकर, बाबू सुपेकर, विशाल जोगदंड, अविनाश कदम, महेश मोहळकर यांच्यासह प्रवाशांनी मदत केली.
जामखेड-सौताडा महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे व खराब रस्त्यामुळे अवजड वाहने साकत मार्गी ये-जा करतात. साकत घाट अरूंद असल्याने अवजड वाहनांना टर्न बसत नाही त्यामुळे या ठिकाणी नेहमी अपघात होतात. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.