Tuesday, November 26, 2024
Homeधुळेसाक्री तालुक्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा

साक्री तालुक्याला पुन्हा गारपीटीचा तडाखा

धुळे । dhule । प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील अनेक गावांना आज पुन्हा अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीचा (hailstorm) तडाखा बसला. आष्टे, ठाणेपाडा, सिंदबन आणि छडवेल कोर्डे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. गेल्या आठवड्यातही याच भागात गारपीट झाली होती. त्यामुळे शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान (Farmer’s loss) झाले होते. आता परत गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकर्‍यांसह वाहन चालकांची मोठी धांदल उडाली.

- Advertisement -

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तर साक्री तालुक्यातही आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह गारपिटीला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी व वाहन चालकांची धावपळ उडाली. शेतकर्‍यांच्या घराबाहेर उभ्या जनावरांना या गारपिटीचा मोठा फटाका बसला आहे.

साक्री तालुक्यात शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा मोहोर व काही प्रमाणात आंब्याच्या कैरीही गळून पडल्या आहेत. जनावरांसाठी गोळा केलेला चारा, शेतातच काढून ठेवलेला गहू पूर्णपणे भिजून गेला आहे. अवकाळी पावसा आणि गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या