Dhule – साक्री – Sakri – प्रतिनिधी :
शहरातील नागरे नगरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून रोख रक्केसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 1 लाख 36 हजारांचा मुद्येमाल लंपास केला आहे. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नागरे नगरात जयदीप अनिल निकम हे राहतात. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून 25 हजार रूपये रोख, बेडरुममधील कपाटातील लॉकर मधील 1 लाख 11 हजार रूपये किंमतीचे 37 ग्रॅमचे सोन्याचे दागिने. त्यात 5 ग्रॅमची अंगठी, 10 ग्रॅमचा गोप, 15 ग्रॅमची माळ, 6 ग्रॅमचे टोंगल, एक ग्रॅमची लहान मुलांची अंगठी, 700 रूपये किंमतीची एक भार चांदी असा एकूण 1 लाख 36 हजार 700 रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले आहे. आज सकाळी ही घटना उघकीस आली.
याबाबत चोरटयाविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयदिप निकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानने घरापासून काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. मात्र चोरटे तेथून वाहनाने पसार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.