Monday, November 18, 2024
Homeक्राईमभरदिवसा दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दुकान लुटले

भरदिवसा दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दुकान लुटले

कोट्यवधीचा ऐवज लांबवला || आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील साकूर (Sakur) येथील बसस्थानक परिसरातील कान्हा ज्वेलर्समध्ये (Kanha Jewellers) बंदुकीचा धाक दाखवून सुमारे पाचशे ते सहाशे ग्रॅम सोने व रोख रक्कम असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज घेऊन धूमस्टाईल दरोडा (Robbery) टाकल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.11 नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये पाच दरोडेखोर (Robber) दुचाकीवर पारनेरच्या (Parner) दिशेने पळाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पथके रवाना केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी , की साकूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून कान्हा ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यामुळे परिसरातील बहुतांश लोक सोने खरेदी करण्यासाठी येथे येत असतात.

- Advertisement -

सोमवारी देखील या दुकाननात लोक येत जात होते. अचानक दुपारच्या सुमारास मास्क लावून पाचजण दुचाकीवर आले. त्यांनी गाडी दुकानाला खेटून बाहेर मध्यभागी लावली. त्यानंतर कान्हा ज्वेलर्समध्ये घुसले आणि इकडे-तिकडे पाहून त्यांनी ज्वेलर्सच्या मालकावर पिस्तुल ताणली. दुकानचा मालक घाबरल्याने तो शांत बसला. मात्र, या दरोडेखोरांनी (Robber) एक-एक दागिना (Jeweller) काढून बॅगमध्ये मालका समोर भरला. संपूर्ण सोने बॅगमध्ये भरल्यानंतर रोख रक्कम देखील काढून नेली.

दरम्यान, ते सर्व सोने व रोख रक्कम बॅगमध्ये घेऊन मालकाला दम दिला. त्यानंतर मालकाचा मोबाईल काढून घेतला आणि दुकानच्या बाहेर पडत असताना आरडाओरडा करून सावध करणार तेच बाहेर येऊन दरोडेखोरांनी भररस्त्यात पिस्तुल (Pistol) काढून फायरिंग केली. त्यानंतर लगेच दुचाकीवर बसून पारनेरच्या (Parner) दिशेने पळाले. ते पारनेरच्या दिशेने जात असताना पुढे मांडवा फाटा येथे लोकांना सांगितले की पाचजण सोने लुटून येत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमले ते अडवण्यासाठी थांबले असता. तेथे देखील दरोडेखोरांनी गाडीवरून फायरिंग केली. पुढे खडकी रस्त्याला ज्वेलर्स दुकान मालकाचा मोबाईल टाकून दिला. त्यानंतर पुन्हा खडकी रस्त्यावर फायरिंग करून पाच दरोडेखोर पारनेरच्या दिशेने पळाले.

याबाबत परिसरातील लोकांनी पोलिसांना (Police) फोन करून कळवले. तोपर्यंत आरोपी (Accused) पसार झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन शोधमोहीम सुरू केली. पोलीस उपधीक्षक डॉ. सोनवणे यांनी पथके तयार करून रवाना केले. खरेतर, भरदुपारी गजबजलेल्या परिसरात दरोडा (Robbery) पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कोटी रुपयांचा दरोडा पडल्याने साकूर (Sakur) परिसरातील अनेकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या