Saturday, July 27, 2024
Homeनाशिक'या' तारखेला सेवानिवृत्त जि. प. कर्मचार्‍यांना एक जुलैची वेतन वाढ

‘या’ तारखेला सेवानिवृत्त जि. प. कर्मचार्‍यांना एक जुलैची वेतन वाढ

नाशिक |प्रतिनिधी

दि.३० जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यामुळे आता ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या जिल्हा परिषद सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना १२ महिन्यांची अहर्ताकारी सेवा गृहीत धरून १ जुलै रोजीची वेतनवाढ लागू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या दि.२८ जुन २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि.३० जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना एक जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्र ही निर्गमित करण्यात आले.

परंतु राज्यातील जिल्हा परिषदांचे कर्मचारी हे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचार्‍यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम शासन निर्णय व परिपत्रके थेट लागू होत नाही आणि सदरील शासन निर्णय लागू करावयाचे झाल्यास महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग हा स्वतंत्र आदेश काढून सादर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करता, यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील हा शासन निर्णय लागू व्हावा. यासाठी जिल्हा परिषद पेंशनर्स असोसिएशन त्याचबरोबर कर्मचारी संघटनानीे मागणी केली होती.

पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता, भुसे व महाजन यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली होती. त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनीही पेंशनर्स असोसिएशन, कर्मचारी संघटना यांच्या निवेदनास अनुसरून, ३० जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शासनास सादर करून ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र देऊन शासनाकडून यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे अशी विनंती केली होती.

पूर्वीच्या काळी शालेय प्रवेशावेळी बहुतांश विद्यार्थ्यांची जन्मतारीख ही जुन महिन्यातील टाकली जात असे त्यामुळे जून महिन्यात नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आहे, या सर्व कर्मचार्‍यांना सादर शासन निर्णयामुळे १ जुलैच्या वार्षिक वेतनवाढीचा सेवानिवृत्ती वेतनात लाभ होणार आहे.

वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार ग्रामविकास विभागाने ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या नाशिक जिल्हा परिषद सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सेवानिवृत्ती वेळी कार्यरत असणाऱ्या कार्यालयाकडे सादर करावे या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने १ जुलै रोजीची वेतनवाढ लागू करण्यात येईल. =

-आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या