Saturday, May 4, 2024
Homeजळगावअमळनेर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे पगार थकले

अमळनेर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे पगार थकले

अमळनेर – प्रतिनिधी Amalner

बाजार समितीच्या सभापती पदाचा तिढा सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांचे दोन महीनांपासून पगार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. संबंधित यंत्रणेने त्वरित दखल घेऊन तिढा सोडवावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्यानन्तर प्रशासक नेमण्यात आले होते त्यांनतर अशासकीय प्रशासक नियुक्त केले होते मात्र विद्यमान संचालक मंडळ न्यायालयात गेल्याने न्यायालयाने प्रशासक मंडळ बरखास्तचे आदेश दिले होते, मात्र अमलनेर बाबत जिल्हा उपनिबंधकानी मार्गदर्शन मागवल्याने सभापती पदावर कोणीच विराजमान होऊ शकलेले नाही परिणामी प्रचंड उत्पन्न असतानाही बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही.

जलगाव, धुळे जिल्ह्यातून अमळनेर कृषी उत्पन्न। बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर आवक येत असल्याने बाजार समितीला उत्पन्न चांगले आहे मात्र न्यायालयाच्या निर्णयाची अमलबाजवणी न झाल्याने सभापती पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार २ महिन्यांपासून रखडले आहेत तसेच काही निर्णय अथवा धोरणात्मक बाबी , विकासात्मक कामे करता येत नाहीत. भाजप आणि महाविकास आघाडीला सभापती पदाच्या खुर्चीची आस लागलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या