Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजनअभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली

अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली

मुंबई | Mumbai

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे हा पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे सलमान खानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाईल. असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

सलमान खानची सुरक्षा हा मुंबई पोलीस आणि राज्य सरकारसाठी सर्वात चिंतेचा विषय बनला होता. कारण दिल्ली पोलिसांकडून सलमान खानला धमकीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळत होती. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनीही सलमान खानबाबत अनेक खुलासे केले होते.

आरोपींचा जबाब आणि तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा एक अहवाल पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला सोपवला होता. यानंतर सलमान खानला शस्त्राचा परवानाही दिला होता, असं सूत्रांनी सांगितलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार सलमानवर हल्ला करण्याची योजना आखत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या