Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयZeeshan Siddique : सलमानच्या नावाचा उल्लेख करत झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची...

Zeeshan Siddique : सलमानच्या नावाचा उल्लेख करत झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, नेमकी मागणी काय?

मुंबई । Mumbai

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे
.
शुक्रवारी सायंकाळी झिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी गुरफान खान नावाच्या २० वर्षाच्या तरुणाला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यांनी मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना महायुतीने वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वमधून शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना हरवून निवडणूक जिंकली होती.

YouTube video player

दरम्यान १२ ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी झिशान सिद्दीकी यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत. ही लॉरेन्स बिश्नोई गँग मागच्या काही काळापासून सलमान खान याला धमकावत होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच ठोस कारण अजून समोर आलेलं नाही. पण बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे निकटवर्तीय होते, म्हणून त्यांना संपवण्यात आल्याच म्हटलं जातय.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...