Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनजुहीसोबत लग्न करण्याची सलमानची होती इच्छा मात्र...

जुहीसोबत लग्न करण्याची सलमानची होती इच्छा मात्र…

मुंबई – Mumbai

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचे चाहते फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत. सलमानचे चित्रपट असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कोणता किस्सा असो त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात कायम शिगेला पोहोचलेली असते.

- Advertisement -

शिवाय यशाचं उच्च शिखर चढत असताना सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्याच्या प्रेम प्रकरणांची चर्चा आजही चाहत्यांमध्ये चांगलीचं रंगते. आता सलमानच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे सलमान पुन्हा चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये त्याने जुहीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एकेकाळी सलमान अभिनेत्री जुहीवर फिदा असल्याचं या मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. शिवाय त्याने जुहीच्या वडिलांकडे जुहीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव देखील मांडला होता. पण जुहीच्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिला.

मुलाखतीत सलमानला जुहीसोबत लग्न करण्याचा प्रश्ना विचारण्यात आला. यावर सलमान म्हणाला, ’जुही अत्यंत प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांना जुहीसोबत लग्न करू शकतो का? असं विचारलं. मात्र तिच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. त्यांनी मला नकार का दिला हे मला माहित नाही.’ म्हणून सलमानची जुहीसोबत लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

सांगायचं झालं तर जुहीचं नाव कधी कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाही. अखेर 1992 साली तिने उद्योगपती जय मेहतासोबत लग्न केलं. एकेकाळी चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारी जुही आता मात्र रूपेरी पडद्यापासून दूर आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...