Tuesday, May 20, 2025
Homeनगरसमनापूर परिसरात दरोडखोरांची टोळी जेरबंद

समनापूर परिसरात दरोडखोरांची टोळी जेरबंद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला काल रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी समनापूर परिसरात पकडले आहे. या दरोडेखोरांकडून पिस्तूल व दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे तर एक दरोडेखोर पसार झाला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरालगतच्या समनापूर चौफुली येथे एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दरोडेखोरांची टोळी आढळली.

ताब्यात घेतलेल्यांची झाडाझडती घेतली असता एकाच्या पॅन्टच्या खिशामध्ये 12 हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल, कमरेला गुंडाळलेली नायलॉनची रस्सी, दुसर्‍याच्या कमरेला खोचलेली काळ्या रंगाची नकली छर्र्‍याची पिस्टल, तिसर्‍याच्या शर्टचे खिशात मिरची पावडर, चौथ्याच्या पॅन्टीच्या खिशात स्क्रू ड्रायव्हर, 3 फुट लांबीचा लाकडी दांडा, पल्सर मोटारसायकल, एक काळ्या रंगाची मोटारसायकल, तीन फुटाचा लोखंडी गज, एक गलोर असा एकूण 1 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश चंद्रभान गायकवाड (वय 23, रा. खांडगाव, ता. संगमनेर), रविंद्र राधाकिसन डेंगळे (वय 38, रा. निमगावजाळी ता. संगमनेर (पसार) व तीन अल्पवयीन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 583/2023 भारतीय दंड संहिता कलम 399, 401, 402 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करत आहे. पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांपैकी काही जणांविरुद्ध यापूर्वीच जबरी दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

0
नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा...