Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याभिडे प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ; फडणवीस म्हणाले,...

भिडे प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ; फडणवीस म्हणाले,…

मुंबई । Mumbai

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून पुन्हा सुरू झाले आहे. मधल्या काळात राज्यभर झालेल्या पावसामुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे अधिवेशनाला दोन दिवसांची सुटी देण्यात आली होती. दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

- Advertisement -

विधानसभेच कामकाज सुरु झाल्यानंतर सर्व वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांनी भिडे विकृत माणूस असल्याचं म्हटलं. त्यानंतर नाना पटोले यांनी सूचना दिली. यावर चर्चेची मागणी केली. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर शुक्रवारी चर्चा झाल्यानं तो पुन्हा चर्चेला घेता येणार नाही असं सांगितलं. त्यानतंरही काँग्रेस नेत्यांकडून गोंधळ सुरुच राहिला.

यावर फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांनी अमरावती इथं एक भाषण केलं, त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यातील आशयावरून त्यांनी काही कमेंट केल्या आहेत.तीन दोन पुस्तके डॉक्टर एसके नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते असल्याचं म्हणणं आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यंनी वाचला. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भिडे गुरूजी म्हणल्याने गोंधळ सुरू झाला. तेव्हा त्यांचे नाव गुरुजी आहे, आम्हाला गुरुजी वाटतात असं फडणवीस म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं अखेर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विरोधकांनी सभात्याग केला.

भिडे हा बोगस माणूस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांचा मुद्दा उपस्थित करत भिडे हा बोगस माणूस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. परंतु अनेक सदस्यांना धमकी आली आहे. मला धमकीचे फोन आणि ई-मेलही आले आहेत. हे ई-मेल मी पोलिसांकडे दिले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तिला अटक केली आहे. कराड पोलिसांनी अटक करून त्याला जामिनावर सोडलं आहे. अनेकांना धमकी आली. कुठूनतरी सूत्रधाराला धमकी देण्यासाठी प्रवृत्त केल्याशिवाय होणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. संभाजी भिडे एक बोगस माणूस आहे. त्यांची डिग्री काय आहे? त्यांनी कुठे शिक्षण घेतलंय? हे कुठे प्राध्यापक होते? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा माणूस सोनं गोळा करतोय. कायद्याप्रमाणे कुठल्याही संस्थेला वर्गीणी जमा करायची असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे संस्था रजिस्टर करावी लागते. त्याचा हिशोब द्यावा लागतो. हा माणूस कितीतरी टनानं सोनं गोळा करणारा आहे. १ ग्रॅम सोनं प्रत्येकाकडून घेतोय. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. परिक्षेच्या वेळेस हे गडकिल्ल्यांची मोहिम राबवतात. बहुजन समाजाची मुलं कुठेतरी फरफटत जावीत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यशोमती ठाकूर यांनाही धमकी आली आहे. आम्ही दाभोळकरांचा खूण केलाय, असं कुणी म्हटलं असेल तर त्याला अटक केली आहे का? आम्हाला धमक्या आले आहेत. परंतु आम्ही पाहून घेऊ, कारण समाजकार्य करत असताना अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या