Saturday, November 23, 2024
Homeनाशिकतानाजी चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; सिटी सेंटर मॉल येथे...

तानाजी चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; सिटी सेंटर मॉल येथे दिले निवेदन

नाशिक | प्रतिनिधी

तानाजी चित्रपटात छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीचा दाखविला गेला आहे. चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून हा भाग तात्काळ वगळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत नाशिक येथील सिटी सेंटर मॉल येथील चित्रपट गृहाच्या संचालकास निवेदन दिले.

- Advertisement -

दरम्यान, नेहमीच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत सजग राहणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविला जात असल्याचे समजताच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्निल इंगळे, जिल्हा सचिव नितिन रोठे पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सरचिटणीस विक्रम गायधनी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष रोहिणी सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेत सिटी सेंटर मॉल येथील चित्रपटगृहाच्या मालकास या चित्रपटात काही दृष्य चूकीची दाखविली जात असून तात्काळ हा भाग वगळावा अशी समज दिली व हा वादग्रस्त भाग न वगळल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यास आपण जबाबदार राहणार असा इशारा देत निवेदन दिले.

यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शुर सरदार तानाजी महाराज की जय, बहुजन महापुरुषांची
बदनामी थांबविलीच पाहिजे अशा घोषणा देत सिटी सेंटरचा परिसर दणाणुन गेला होता.

चित्रपटात दाढीवाली व्यक्ति बसली असून तो व्यक्ति शिवाजी महाराजांना लाकडी वस्तु फेकून मारतात हा प्रसंग चुकीचा आहे. यात शिवरायांची बदनामी होत आहे.

-डॉ स्वप्निल इंगळे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

चित्रपटात अभिनेत्री काजोलच्या तोडूंन शिवरायांची तलवार जेव्हा चालते तेव्हा ब्राम्हणांचे जानवे सुरक्षित राहते असे वाक्य आहे. मात्र शिवरायांचे राज्य हे अठरा पगड़जातींचे राज्य होते. या चित्रपटात संकुचित दाखवित बदनामी केली आहे ही चूकीची दृष्य वगळावी अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

-नितिन रोठे पाटील,जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या