Tuesday, November 19, 2024
HomeराजकीयChhatrapati Sambhajinagar : बोटाला शाई लावून पैसे वाटप, शिरसाटांच्या फोननंतर पोलिसांनी २...

Chhatrapati Sambhajinagar : बोटाला शाई लावून पैसे वाटप, शिरसाटांच्या फोननंतर पोलिसांनी २ कोटी सोडले; अंबादास दानवे यांचा धक्कादायक आरोप

छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (दि २०) तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरात मतदानकार्ड किंवा आधार कार्ड जमा करुन मतदान न करण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे . या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारावरुन आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे.

https://twitter.com/iambadasdanve/status/1858567384128270584

याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी.” अशी मागणी केली आहे.

https://twitter.com/iambadasdanve/status/1858757988741509368
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या