Sunday, June 16, 2024
Homeनगरसंपदा पतसंस्था गैरव्यवहारातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

संपदा पतसंस्था गैरव्यवहारातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

- Advertisement -

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संपदा नागरी पतसंस्थेत बोगस कर्जप्रकरण करीत सुमारे 13 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. भाऊसाहेब खुशाबा झावरे (65) असे मृत आरोपीचे नाव आहे.

ऑगस्ट 2011 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) लेखा परीक्षक देवराम बारस्कर यांच्या फिर्यादीनुसार, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात विनातारण कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच आरोपींनी रकमेचा अपहार करून स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. याप्रकरणी एप्रिल महिन्यात न्यायालयाने 22 आरोपींना या गुन्ह्यात दोषी मानले. त्यात भाऊसाहेब झावरे यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांना नाशिकरोड कारागृहात ठेवण्यात आले.

मात्र तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी न्यायालयीन पथक, कारागृह पथक व नाशिकरोड पोलिसांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या