Friday, April 25, 2025
Homeनगरआयशर आणि कारचा भीषण अपघात

आयशर आणि कारचा भीषण अपघात

सासरे जावई ठार, दोघे गंभीर गंभीर

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

समृध्दी महामार्गावरील (Samruddhi Highway) विरुद्ध दिशेने येणार्‍या आयशर ट्रकने क्रेटा कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) कार मधील सासरे जावई ठार (Death) झाल्याची घटना आज रोजी पहाटे घडली. वैजापूर पोलिसांनी (Vaijapur Police) दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी समृध्दी महामार्ग चॅनल क्रमांक 490.6 वर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या आयशर ( क्र.डीडी 01 एन 9275) ने कार (क्र.एम एच 27 डी एल 7713) ला समोरासमोर जोराची धडक (Hit) दिली. या धडकेत रामचंद चंदुलाल मेठानी (55, रामपुरी काम, काकिमा आश्रम अमरावती आणि नामदेव ढालूलाल पोपटाणी(45 जुना सिंधी कॉलनी नंदुरबार) हे दोघे ठार झाले. मयत दोघेही नात्याने सासरे जावई आहेत.

- Advertisement -

रामचंद्र मेठानी हे अमरावती (Amravati) येथून नाशिक (Nashik) येथे भावजय यांची अस्थी विसर्जनासाठी मुलगा दीपक कुमार मेठानी, जावई नामदेव पोपटानी तसेच मित्र रमण टेकवाणी यांच्यासह क्रेटा या कारने समृद्धी मार्गावरून (Samruddhi Highway) जात होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक 490 वर समोरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या आयशरने मेठानी यांच्या कारला जोराची धडक दिली. यात रामचंद मेठानी आणि नामदेव पोपटानी हे गंभीर जखमी झाले. वैजापूर पोलिसांनी (Vaijapur Police) घटनास्थळी जात जखमींना (Injured) वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दोघांना डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. तर दीपक कुमार मेठानी व रमण टेकवानी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आयशर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...