Monday, May 19, 2025
Homeनगरसमृद्धीच्या उड्डाण पुलाजवळ महामार्गावर पडले मोठमोठे खड्डे

समृद्धीच्या उड्डाण पुलाजवळ महामार्गावर पडले मोठमोठे खड्डे

घारी |वार्ताहर| Ghari

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते पुणतांबा फाटा या राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अंतर्गत येणार्‍या महामार्गावर चांदेकसारे गावालगत समृद्धी महामार्गाच्या उड्डाण पुलाजवळ महामार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

या ठिकाणी एका बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून एकाच बाजूने वाहने चालविणे भाग पडत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता वाढली आहे. कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताचा प्रसंग येऊ शकतो. शासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीचा फटका निष्पाप नागरिकांना बसत असून हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज असल्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे या रस्त्यावर याअगोदर देखील मोठ्या प्रमाणावर अपघात झालेले आहेत.

या अपघातात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले तर काहींना जायबंदी व्हावे लागले. ज्या प्रवाशांचा मृत्यू त्या कुटुंबाचा कुठल्याही प्रकारे दोष नसताना या खराब रस्त्याची किंमत या कुटुंबांना मोजावी लागते. शासकीय अधिकार्‍यांना फारसे गांभीर्य वाटत नसल्याने याची किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात? असा सवाल देखील नागरिक विचारत आहेत. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

याठिकाणी समृद्धी महामार्गाच्या उड्डाण पुलाचे खाली जाणार्‍या व येणार्‍या वाहनांना स्वतंत्र दोन मार्ग ठेवलेले आहेत. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे एकाच बोगद्यातून दोन्ही बाजूची वाहतूक चालू आहे आणि नेमके त्याच बाजूला ऐन तोंडावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. संपूर्ण उन्हाळा गेला तरीदेखील येथे रस्त्याची दुरुस्ती करण्याची तसदी ना समृद्धीच्या ठेकेदाराने घेतली ना अधिकार्‍यांच्या ही गोष्ट ध्यानात आली, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून या अडचणी दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्ते व महामार्ग यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी यासारख्या मोठ्या यंत्रणा कार्यरत असताना तेथील अधिकार्‍यांना या गोष्टी दिसत नाहीत का? समृद्धी महामार्गाचे ठेकेदाराने उड्डाणपुलाखाली दोन्ही बोगद्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करून तेथील रस्ता सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे.

व्ही. टी. होन, सेवानिवृत्त शिक्षक, चांदेकसारे

अनेकदा एमएसआरडीसी नाशिक व छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे या महामार्गाच्या दुरुस्ती देखभालीसाठी पाठपुरावा करून देखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिवसेना स्टाईलने याचे उत्तर देऊन लवकरच या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करावे लागेल.

राहुल होन, शिवसेना (उबाठा) कोपरगाव तालुका संघटक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ मे २०२५ – फार नाही मागणे

0
नुकताच जागतिक कुटुंब दिवस जगाने साजरा केला. अनेक पाश्चात्य देशांमध्ये कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याचे नेहमीच बोलले जाते. बहुसंख्य देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक आढळतो. तेथील समाज...