कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरालगत असलेल्या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) कोपरगाव-शिर्डी इंटरचेंजवर अवैध गुटखा व सुगंधी तंबाखूची (Illegal Gutkha and Tobacco) वाहतूक करणारा आयशर टेम्पो परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे (DYSP Santosh Khade) यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी पकडला. या कारवाईत 64 लाख 80 हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूसह टेम्पो असा एकूण 76 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायावर कारवाया करीत आहेत. मंगळवारी दुपारी त्यांच्या पथकाने वेशांतर करून कोपरगाव येथील समृद्धी महामार्गावर कोपरगाव-शिर्डी इंटरचेंज (Kopargav Shirdi Interchange) येथे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा एमएच 46 बीबी 8098 क्रमांकाचा आयशर टेम्पो पकडला.
चालक टेम्पोतील गुटखा अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात देवून तर काही मुंबईकडे (Mumbai) घेऊन जात होता. या टेम्पोमधून 64 लाख 80 हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू, आरएमडी गुटखा, विमल गुटखा, पान मसाला आढळून आला. बारा लाख रुपयांच्या टेम्पोसह 76 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चालक पोलिसांच्या ताब्यात असून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात (Kopargav City Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या कारवाईत परिविक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अहिल्यानगर शहर विभाग, पोलिस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ, पो.कॉ. शंकर चौधरी, पो.कॉ. दिगंबर कारखेले, पो.कॉ.दिनेश मोरे, पो.कॉ. अरविंद भिंगारदिवे, पो.कॉ.उमेश खेडकर, पो.कॉ. सुनिल पवार, पो.कॉ. अजय साठे, पो.कॉ. मल्लिकार्जुन बनकर, पो.कॉ. अमोल कांबळे, पो.कॉ. सुनिल दिघे, पो.कॉ. संभाजी बोराडे, पो.कॉ.दीपक जाधव, पो.कॉ. विजय ढाकणे आणि पो.कॉ. जालींदर दहिफळे यांनी केली आहे.




