Friday, May 3, 2024
Homeनाशिकविद्राेही संमेलनात ‘संविधान’ प्रबाेधन : ३० समित्यांचे १७० प्रतिनिधी कार्यरत

विद्राेही संमेलनात ‘संविधान’ प्रबाेधन : ३० समित्यांचे १७० प्रतिनिधी कार्यरत

नाशिक | प्रतिनिधी

संविधान सन्मानार्थ येत्या २५ आणि २६ मार्च राेजी नाशिकच्या मविप्रच्या मैदानात आयाेजित १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी विविध ३० समित्या कार्यरत करण्यात आल्या आहेत. यामध्ये १७० प्रतिनिधींचा समावेश असून संविधान प्रबाेधन संमेलनातून केले जाणार आहे. शहरातील त्र्यंबक राेडवरील टिळक वाचनालय येथे या संमेलनाच्या नियाेजनासाठी बैठक प्रभाकर धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली…

- Advertisement -

प्रास्ताविक मुख्य संयोजक कॉ. राजू देसले यांनी केले. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या साहित्य संमेलन विषयक कामाचा आढावा कॉ. किशोर ढमाले यांनी सादर केला. बैठकीत विविध समित्यांचे गठण करण्यात आले.

विविध समितीचे प्रस्ताव वाचन राकेश वानखेडे यांनी केले. यामध्ये सर्वच निधी संकलन, तालुका समन्वय, मुठभर धान्य आणि एक रूपया विद्रोहीसाठी मोहीम, ठराव, भोजन, कार्यक्रमपत्रिका, संविधान प्रबोधन, अतिथी व्यवस्था, निमंत्रण, पुस्तक प्रकाशन, प्रवेशद्वार निर्माण,

संपर्क, ठराव, चित्रप्रदर्शन, कवीसंमेलन नोंदणी, छायाचित्र, बालमंच, मंच, मंडप, छापाई, वीज, पाणी, प्रसिद्धी, शाहीर नोंदणी, पुस्तक स्टॉल नोंद, आरोग्य, संमेलन लाइव, दिवंगत बाबुराव बागुल व वामनदादा कर्डक सप्ताह, निवास स्वच्छता समिती आदी ३० समित्यांचे प्राथमिक गठण करण्यात आले.

त्यांत १७० कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. आदिवासी कथाकार संजय डोबाडे यांच्या पुस्तक प्रकाशनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. गुणवंत वाघ यांच्या गीताने बैठकीचा समारोप झाला.

बैठकीला मुख्य निमंत्रक प्रा. डॉ. इंदिरा आठवले, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे, व्ही. टी. जाधव, प्रा. अशोक धुलधुले, सुभाष काकुस्ते, प्रज्ञा गायकवाड, प्रज्ञा धुलधुले, साराभाई वेळुंजकर, नितीन रोठे-पाटील, अर्जुन बागुल, दत्ता वायचळे, पंढरीनाथ पगारे, अनिल आठवले,

अरूण शेजवळ, नानासाहेब पटाईत, यशवंत बागुल, शिवदास म्हसदे, अजमल खान, गुणवंत वाघ, किसनराव खिल्लारे, संदीप ससाणे, प्रमोद अहिरे, संजय दोबाडे, प्रल्हाद पवार, विजय जगताप, नवनाथ आढाव, गिरीश शाकुंतल, विक्रम गायधनी, लकी बाविस्कर, राज निकाळे, सुनिल परवे, पी. कुमार धनविजय, ज्ञानेश्वर घुलाटे, संदीप ढवळे, आकाश नंद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या